सिनेस्टाईल प्रेम व्यक्त करून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:06 IST2019-12-24T13:04:37+5:302019-12-24T13:06:00+5:30
माझ्याशी लग्न न केल्यास माझ्या जिवाचे बरेवाईट करुन घेईन असे म्हणत अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणाऱ्याच्या विराेधात गुन्हा दाखल

सिनेस्टाईल प्रेम व्यक्त करून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
पिंपरी : काचेची बाटली स्वत:च्या डोक्यात मारून घेतली. तसेच जिवाचे काही बरेवाईट करून घेईन, अशी धमकी देऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करून सोबत राहू, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे शुक्रवारी (दि. 20) हा प्रकार घडला.
याप्रकरणी 17 वर्षीय मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दादा गडसिंग (वय 25, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी कॉलेजसमोर असताना आरोपी तेथे आला. त्याच्या हातातील काचेची बाटली त्याने स्वत:च्या डोक्यात मारून घेतली. मी स्वत:च्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईन, अशी धमकी दिली. माझे तुझ्यावर प्रमे आहे, आपण लग्न करून सोबत राहू, असे म्हणून अल्पवयीन मुलीस घेऊन जाऊन पुन्हा कॉलेजसमोर आणून सोडले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.