मुलीचा अल्पवयीन मुलाकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 19:34 IST2019-09-22T19:29:59+5:302019-09-22T19:34:43+5:30
क्लासवरुन घरी जाणाऱ्या मुलीचा अल्पवयीन मुलाने विनयभंग केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे.

मुलीचा अल्पवयीन मुलाकडून विनयभंग
पिंपरी : क्लासवरून घरी जात असलेल्या मुलीचा अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. ‘‘मला तुझ्याशी बोलायचे आहे,’’ असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. मोशी येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, याप्रकरणी पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार १५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास क्लासवरून घरी जात होती. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग केला. मुली जवळ आला व म्हणाला, ‘‘मला तुझ्याशी बोलायचे आहे.’’ मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.