सूरज ऊर्फ डिप्शा गायकवाड टोळीवर मोका; भोसरी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:49 PM2021-07-23T21:49:12+5:302021-07-23T21:51:05+5:30

एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात एकूण बारा गुन्हे दाखल..

Mocca action on Suraj or Dipsha Gaikwad gang; Bhosari police action | सूरज ऊर्फ डिप्शा गायकवाड टोळीवर मोका; भोसरी पोलिसांची कारवाई

सूरज ऊर्फ डिप्शा गायकवाड टोळीवर मोका; भोसरी पोलिसांची कारवाई

googlenewsNext

पिंपरी : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ डिप्शा गायकवाड व त्यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सुरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड ( वय २१ रा. लकी स्कॅप सेंटर मागे, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी ) जावेद लालसाहब नदाफ ( वय २२ ) रा. नाल्याजवळ महात्मा फुलेनगर झोपडपट्टी भोसरी, अजय बाळु ससाणे, ( वय २२ ) मस्जिद जवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी भोसरी, ओंकार ऊर्फ अण्णा बाळु हजारे ( वय २५ रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई केली आहे.

आरोपींविरोधात दुखापत, जबरी चोरी, विनयभंग करणे, बेकायदा जमाव जमवून दरोडा, जबर दुखापत, खंडणी उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे, असे एकूण बारा गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचा वापर करून वर्चसवासाठी व फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाई करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचेकडे पाठविला होता.

पोलीस उपआयुक्त ( गुन्हे) सुधीर हिरेमेठ , सहायक पोलीस आयुक्त पीसीबी ( गुन्हे १) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र गौर यांनी प्रस्ताव आदेश पारीत करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे पाठविला. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आदेश पारीत केला.

Web Title: Mocca action on Suraj or Dipsha Gaikwad gang; Bhosari police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.