मोबाईल चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:21 IST2018-08-24T18:20:43+5:302018-08-24T18:21:19+5:30
नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल चोरट्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित यश पाटील व त्याच्या साथीदाराने १८ आॅगस्ट रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या डीओ मोपेडवर येऊन सुहास वसंतराव मोरे (रा. सप्तशृंगी देवी मंदिराजवळ, डीजीपीनगर - 2) हे घराजवळ पायी चक्कर मारीत असताना त्यांच्या हातातील १४ हजार रुपयांचा मोबाईल बळजबरीने खेचून नेला.
याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपास करून संशयित यश पाटील यास ताब्यात घेतले़