शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

किशोर आवारेंच्या हत्येमागे आमदार सुनील शेळकेंचा हात? आवारेंच्या आईंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:21 IST

भरदिवसा आवारे यांची अमानुषपणे हत्या झाल्याने येथील व्यापारी व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते

पिंपरी : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी (दि. १२) भरदुपारी दोनच्या सुमारास जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर चार जणांनी कोयत्याने वार करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांच्या आईने ही हत्या राजकीय वैमनस्यातून केली असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या आईने आई सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादित आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगरडकर यांच्यावर आरोप केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आवारे हे शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्यांसोबतची बैठक झाल्यानंतर ते पावणेदोनच्या सुमारास नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी नगर परिषदेच्या इमारतीच्या मागे दबा धरून बसलेल्या आरोपींनी आवारे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच बंदुकीतून गोळीबार केला.

हत्येनंतर आरोपी तेथे काही क्षण थांबले. त्यानंतर तेथून पळ काढत रस्त्यावरील दुचाकीस्वारांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी हिसकावून पळ काढला. आवारे यांना लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांना मृतघोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

भय इथले संपत नाही...

आवारे यांची हत्या भरदिवसा नगर परिषदेच्या आवारात अगदी गर्दीच्या ठिकाणीच झाली. नगर परिषदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर मारुती चौक आहे. हा चौक नेहमीच माणसांनी गजबजलेला असतो. बँक तसेच महत्त्वाची दुकाने याच चौकात आहेत. गोळीबाराने आणि हत्येची माहिती मिळताच इथे एकच घबराट पसरली. दुकानदारांनी आहे त्या स्थितीत आपली दुकाने बंद केली. दुकानाच्या बाहेरील माल तसाच ठेवून तातडीने दुकाने बंद केली. हजारो रुपयांचा माल दुकानाबाहेर असतानाही दिवसभर दुकानमालक पुन्हा त्याठिकाणी फिरकले सुद्धा नाहीत. दिवसभर येथील व्यापारी व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMLAआमदारPoliticsराजकारण