किरकोळ भांडणात पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:36 IST2021-05-28T18:36:26+5:302021-05-28T18:36:47+5:30

पिंपरीतील घटना, पतीला अटक

In a minor altercation, the husband strangled his wife to death | किरकोळ भांडणात पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

किरकोळ भांडणात पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

ठळक मुद्देशिवी दिल्याचा राग मनात धरून घडला खुनाचा प्रकार

पिंपरी: देहूगावात किरकोळ कारणावरून झालेल्या पती-पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पतीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पुजा वैभव लामकाने (वय १९) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती वैभव भगवान लामकाने (वय २३ , रा., देहूगाव) याला पोलिसांनीअटक केली आहे.

महिलेचे वडील सोमनाथ रामदास पाटील (वय ५०, रा. देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि वैभव या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणात पुजाने वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पतीला ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In a minor altercation, the husband strangled his wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.