नाणे मावळातील हॉटेलवर मध्यरात्री दरोडा; ३५ हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:04 IST2017-12-11T13:01:38+5:302017-12-11T13:04:37+5:30

जांभवली गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यालगत ठाक भैरी कृषी पर्यटन हॉटेल वर रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांनी मिळून दरोडा टाकला.

Midnight dacoity at a hotel in Nane Maval; 35 thousand rupees with a thieved | नाणे मावळातील हॉटेलवर मध्यरात्री दरोडा; ३५ हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार

नाणे मावळातील हॉटेलवर मध्यरात्री दरोडा; ३५ हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार

ठळक मुद्दे३५ हजाराची रोख रक्कम व सोने अशी चोरी करुन चोरटे पसारघटनास्थळी कामशेत पोलीस कर्मचारी दाखल

कामशेत : नाणे मावळातील जांभवली गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यालगत ठाक भैरी कृषी पर्यटन हॉटेल वर रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांनी मिळून दरोडा टाकला. यावेळी सुमारे ३५ हजाराची रोख रक्कम व सोने अशी चोरी झाली असून चोरटे हे चार ते पाच दुचाकीवरून आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी चोरट्याने हॉटेल मधील कर्मचारी जोडप्याला मारहाण करून कोंडून ठेवले होते. 
घटनास्थळी कामशेत पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा व तपास सुरू आहे.

Web Title: Midnight dacoity at a hotel in Nane Maval; 35 thousand rupees with a thieved