गोवा: म्हापशात इंडियन ओवरसीस बँकेवर दरोड्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:06 PM2017-12-08T18:06:09+5:302017-12-08T18:06:49+5:30

उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून तसेच इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

Goa: Draft of Dacoity in Indian Overseas Bank in Mapusa | गोवा: म्हापशात इंडियन ओवरसीस बँकेवर दरोड्याचा प्रयत्न 

गोवा: म्हापशात इंडियन ओवरसीस बँकेवर दरोड्याचा प्रयत्न 

Next

म्हापसा : उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून तसेच इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. घटना आज संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमाराला बँकेतील दैनंदिन व्यवहार बंद होण्याच्या वेळेला घडली. 

पाच दरोडेखोरांनी जबरदस्तीने बँकेत प्रवेश करुन शाखा व्यवस्थाकाच्या कॅबिनवर तसेच आतील परिसरावर ताबा मिळवला.  व्यवस्थाकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून नंतर बँक लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकेत असलेल्या लोकांना बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्या लोकांना आत प्रवेश करण्यास सक्त मनाई केली.  या गडबडीत त्यातील एका दरोडेखोराने हवेत गोळीबार करुन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्नही केला. तसेच बँकेत रोख रक्कम व दागीने लुटण्याचा प्रयत्न सुरु केला. 

दरम्यानच्या काळात बँकेबाहेर असलेल्या सतर्क लोकांनी आत असलेल्या दरोडेखोरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. होत असलेल्या दगडफेकीमुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघेजण बाहेर असलेल्या नागरिकांच्या तावडीत सापडले. नागरिकांनी दोघांनी यथेच्छ चोप देऊन घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. तर इतर तिघेजण पळून जाण्यास यशस्वी ठरले. तिघांनाही पकडण्यासाठी राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अलिकडच्या दोन वर्षात बँकेवेर दरोडा टाकण्याची ही दुसरी घटना आहे. म्हापसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकून सुमारे २० लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली होती. या दरोड्यातील काही जणांना अटक करण्यात आवी असली तरी रोख रक्कम अद्याप सापडली नाही. 

Web Title: Goa: Draft of Dacoity in Indian Overseas Bank in Mapusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.