"मेरे साथ चलती क्या..." भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 14:31 IST2022-11-30T14:28:52+5:302022-11-30T14:31:32+5:30
पोलिसांकडून ३३ वर्षीय आरोपीला अटक...

"मेरे साथ चलती क्या..." भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी अटकेत
पिंपरी : मेरे साथ चलती क्या, असे म्हणत अल्पवयीन मुलीचा हात पकडत तिच्याशी गैरवर्तन केले. ही घटना सोमवारी (दि.२८) साडेअकराच्या सुमारास भोसरी येथे घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. तुम मुझे बहोत पसंत हो. मेरे पास बहोत पैसे है, असे म्हणत अल्पवयीन मुलीचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली.