शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
7
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
8
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
9
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
10
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
11
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
12
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
13
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
14
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
15
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
16
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
17
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
18
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
19
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
20
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षाचा मान मावळला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:30 IST

उपाध्यक्षाची संधीही ५२ वर्षांत मिळाली नसल्याने परिसरातून नाराजी

ठळक मुद्देपुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी मंत्रालयात तालुका अद्याप वंचितच

वडगाव मावळ : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शोभा कदम,  तर उपाध्यक्ष किंवा बांधकाम खात्याचे सभापतीपदसाठी बाबुराव वायकर यांच्या रूपाने मावळाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पुणे  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी मंत्रालयात झाली.अध्यक्षपद हे सर्वसाधरण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे  मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का, अशी चर्चा रंगत आहे. ५२ वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला आजपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.    जिल्हा परिषदेवर पूर्वीपासूनच एकत्रित काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व राहिले आहे. १९९७  मध्ये दिवंगत दिलीप टाटिया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते. तर मागील पंचवार्षिकमध्ये अतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती होते. जिल्हा परिषदेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.   राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा कदम, कुसुम काशीकर व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष बाबूराव वायकर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. मावळ तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदारकी भाजपाच्या ताब्यात होती़ मावळ विधानसभेच्या निवडणुकीत २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके विजयी झाले. त्यामुळे मावळ तालुक्याला झुकते माफ मिळेल, अशी फलदायी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे पाच सदस्य असून, तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. नितीन मराठे व अलका धानिवले हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर आणि अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांना उपाध्यक्ष किंवा बांधकाम खात्याचे सभापतीपद मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे़ जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम यांचे नावही चर्चेत आहे. दरम्यान मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे या वेळी मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल.........पुणे जिल्हा परिषदेत मावळ तालुक्याला महत्त्वाचे पद या वेळी आणणारच आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. तालुक्यातील जनतेमुळे मला आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तालुक्याला महत्त्वाचे पद आणणार. - सुनील शेळके, आमदार. 

टॅग्स :mavalमावळzpजिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा