शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:30 IST

Maval Assembly Election 2024 Result स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला

पिंपरी : मावळ मतदारसंघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला आणि महाविकास आघाडीने उचलून धरलेला ‘मावळ पॅटर्न’ फेल झाला आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर राष्ट्रवादी अजित पवार गटच्या सुनील शेळके यांनी पुन्हा विजयी गोल केला. स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत त्यांनी एकट्याने विजय खेचून अणला.

मावळात अजित पवार गट आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात लढत झाली. या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. येथे मागील वेळेपेक्षा ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान जादा झाले होते. पूर्वी भाजपमध्ये असलेल्या आमदार शेळकेंनी २०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून शेळके आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. यंदा भाजपने दावा केल्यानंतरही ही जागा अजित पवारांच्या गटाला मिळाली. त्यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. मात्र, महायुतीतील नेते अपक्षासोबत तर मतदार शेळके यांच्यासोबत राहिल्याचे मतदानातून दिसून आले आहे.

सुनील शेळकेंनी एकट्याने लढवला किल्ला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदाचे राजीनामे देत भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडी, मनसेने स्वत:चा उमेदवार उभा न करता अपक्षाला पाठिंबा देत या ‘पॅटर्न’ला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही पदाधिकारी भेगडेंच्या प्रचारात उतरले होते. शेळके यांनी विश्वासू पदाधिकाऱ्यांना सोबत घेत किल्ला लढवला.

शेळकेंच्या विजयाची कारणे

१) पाच वर्षांत केलेली विकासकामे२) मतदारांशी असलेला थेट ‘कनेक्ट’३) लाडकी बहीण योजनेचे मतांमध्ये रूपांतर करण्यात आलेले यश४) विकासकामांचा प्रचारात योग्य वापर

भेगडेंच्या पराभवाची कारणे

१) मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात अपयश२) उशिरा भूमिका घेतल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यास उशीर३) भाजपच्या पारंपरिक मतदारांनी फिरवलेली पाठ४) शहरी मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maval-acमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार