शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 19:30 IST

अशात या दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार माध्यमांशी बोलतांना नेमकं काय घडले हे सांगितले आहे. यावेळी दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की,

मावळ (पिंपरी-चिंचवड) :पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचाव कार्यात गुंतली असून, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले असून, सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलताना घटनेचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले,“पूल अचानक कोसळला आणि मीही पाण्यात पडलो. पण कसाबसा बाहेर आलो आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मी थोडक्यात बचावलो.” या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे. कारण, मावळमधील शेलारवाडीजवळील कुंडमळा परिसरातील हा पूल आधीपासूनच धोकादायक स्थितीत होता. पुलाच्या तुटक्या कठड्यांबाबत आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर दुर्लक्षित पूल कोसळला आणि दुर्दैवी घटना घडली.हा पूल अत्यंत अरुंद होताएका वेळी फक्त एकच दुचाकी पुलावरून जाऊ शकत होती. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, परिसरात पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे रोज जीव मुठीत धरून स्थानिकांना आणि पर्यटकांना प्रवास करावा लागत होता.संरक्षण विभागाने पूर्वी हा लोखंडी साकव पूल उभारला होता, पण तो अपूर्ण अवस्थेतच होता. पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होते, त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरायचे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना धोका पत्करावा लागत होता. या दुर्घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळPuneपुणेAccidentअपघात