Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 19:30 IST2025-06-15T19:27:03+5:302025-06-15T19:30:11+5:30
अशात या दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार माध्यमांशी बोलतांना नेमकं काय घडले हे सांगितले आहे. यावेळी दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की,

Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
मावळ (पिंपरी-चिंचवड) :पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचाव कार्यात गुंतली असून, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले असून, सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलताना घटनेचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले,“पूल अचानक कोसळला आणि मीही पाण्यात पडलो. पण कसाबसा बाहेर आलो आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मी थोडक्यात बचावलो.”
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे. कारण, मावळमधील शेलारवाडीजवळील कुंडमळा परिसरातील हा पूल आधीपासूनच धोकादायक स्थितीत होता. पुलाच्या तुटक्या कठड्यांबाबत आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर दुर्लक्षित पूल कोसळला आणि दुर्दैवी घटना घडली.
हा पूल अत्यंत अरुंद होता
एका वेळी फक्त एकच दुचाकी पुलावरून जाऊ शकत होती. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, परिसरात पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे रोज जीव मुठीत धरून स्थानिकांना आणि पर्यटकांना प्रवास करावा लागत होता.
संरक्षण विभागाने पूर्वी हा लोखंडी साकव पूल उभारला होता, पण तो अपूर्ण अवस्थेतच होता. पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होते, त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरायचे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना धोका पत्करावा लागत होता. या दुर्घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.