शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रहाटणी येथे इमारतीला भीषण आग; कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य जळून खाक, १ कोटींचे नुकसान

By नारायण बडगुजर | Updated: January 27, 2025 14:50 IST

इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरही आगीचे लोळ आणि धुरामुळे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

पिंपरी : अचानक आग लागून कापड दुकान आणि डेंटल क्लिनिकमधील साहित्य खाक झाले. या भीषण आगीत एक कोटी १५ लाखांचे नुकसान झाले. रहाटणी येथील शिवार चौकातील राॅयल अव्हेन्यू या इमारतीत सोमवारी (दि. २७) रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी  येथील शिवार चौकात राॅयल अव्हेन्यू ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आदित्य फॅशन हब नावाचे कापड दुकान आहे. या इमारतीत सोमवारी रात्री अचानक आग लागली. आदित्य फॅशन हब या दुकानात कापड असल्याने आगीने लगेचच रौद्र रुप घेतले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दुकानातून बाहेर आले. यात दुकानाच्या वरच्या मजल्यावरील दातांच्या दवाखान्याला देखील आग लागली. दवाखान्यातील खूर्ची, फर्निचर, इलेक्ट्रिक बर्ड खाक झाले. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरही आगीचे लोळ आणि धुरामुळे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात जिवीतहानी झाली नाही. आगीत एक कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.  

दरम्यान, माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य केंद्रातील दोन, तसेच भोसरी, चिखली, मोशी, रहाटणी आणि थेरगाव केंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. 

क्षणात सर्वकाही खाक झाले

राॅयल अव्हेन्यू या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर डाॅ. वैशाली ठोके यांचे डेंटल क्लिनिक आहे. आग लागल्याबाबत डाॅ. वैशाली यांना रात्री दोनच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून दवाखान्याचे नूतनीकरण केले होते. मात्र, आग लागून क्षणात सर्वकाही खाक झाले, असे डाॅ. वैशाली यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfireआगWaterपाणीMONEYपैसाrahatniरहाटणीSocialसामाजिक