सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

By अोंकार करंबेळकर | Updated: October 15, 2019 16:12 IST2019-10-15T16:10:49+5:302019-10-15T16:12:03+5:30

विवाहितेच्या पतीसह, सासू-सासरे व अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल

Married women tortured by the husband family for not beautiful | सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

पिंपरी : दिसायला चांगली नाही, असे म्हणून सासरच्यांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच नवीन घर घेण्यासाठी नातेवाईकांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केला. चिखली येथे ११ मे २०१६ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेच्या पतीसह, सासू-सासरे व अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिसायला चांगली नाही, असे म्हणून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, तिच्याकडे माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. जोपर्यंत पाच लाख रुपये आणत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, असे सांगून पती निघून गेला. यामुळे फिर्यादी या आपल्या सासऱ्यांच्या घरी गेल्या. दरम्यानच्या काळात सासऱ्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस केली. तसेच फियार्दी विवाहिता यांना घरातून हाकलून दिले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Married women tortured by the husband family for not beautiful