सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:03 IST2019-09-17T20:02:54+5:302019-09-17T20:03:48+5:30
लग्न झाल्यापासून सासरचे मंडळी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करत..

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक
पिंपरी : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार छळ केला. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर भागुजी हवाले (वय ५५, रा़ उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती संदीप विष्णू हसनाळे (वय ३७, रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सासू शशीकला विष्णू हसनाळे (वय ६५), शेखर डहाके (वय ३२) भामाबाई एकनाथ केळगंद्रे (वय ६५) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मीना हिचे २००७ मध्ये संदीप हसनाळे याच्यासोबत लग्न झाले. लग्न झाल्यापासून सासरचे मंडळी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करत. तसेच विनाकारण भांडणे करून मीनाचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला कंटाळून मीना यांनी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.