पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 15:36 IST2021-04-13T15:35:53+5:302021-04-13T15:36:54+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपी पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केला.

Married women harassment who opposing to husband's extra marital affair | पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा छळ करण्यात आला. बेलठिकानगर, थेरगाव येथे २००८ ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती विजय दगडू फरांदे (वय ५०, रा. पवार नगर, थेरगाव), सासू सुमन दगडु फरांदे (रा. आनेवाडी, ता. जावळी, जि. सातारा), नणंद सविता तानाजी जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा), दीर अण्णा उर्फ धनंजय दगडू फरांदे, जाऊ सिंधू अण्णा उर्फ धनंजय फरांदे (दोघेही रा. थेरगाव), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपी पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केला. त्या कारणावरून फिर्यादीला वारंवार शिवीगाळ, मारहाण करून आरोपी पतीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादीने इतर आरोपींना सांगितले असता त्यांनीही फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी बाबत उलट सुलट सांगून तिच्या पतीला भडकावून दिले. त्यांच्या सांगण्यावरून आरोपी पतीने फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Married women harassment who opposing to husband's extra marital affair