शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:14 PM

विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली.

पिंपरी : माहेरहून हुंडा म्हणून बीअर बार किंवा आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               पती पवनकुमार घनवट, सासू संध्या घनवट, सासरा गोपाळ घनवट (सर्व रा. इंद्रेश्वरनगर, एरिगेशन कॉलनी, इंदापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयहिंद कॉलनी, रहाटणी फाटा, थेरगाव येथे राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.              पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. हुंडा म्हणून सासरच्या मंडळींनी पैसे न मागता विवाहितेच्या आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणावा किंवा बीअर बार सासरच्या मंडळींच्या नावावर करून घ्यावा, अशी मागणी केली. त्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत उपाशी ठेवून अपरात्री घराबाहेर काढले. विवाहितेच्या आईलाही धमक्या देत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच विवाहितेच्या मुलाला आरोपींनी स्वत:कडे ठेवून घेतले, यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीdowryहुंडाPoliceपोलिसwakadवाकड