माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासू, दिरावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:06 IST2021-06-21T12:06:36+5:302021-06-21T12:06:52+5:30
किरकोळ कारणावरून त्यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाणही केली

माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासू, दिरावर गुन्हा दाखल
पिंपरी: माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सप्टेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. विवाहितेने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पती अकबर मेहबूब तांबोळी (वय २८), दीर ईलाही मेहबूब तांबोळी (वय २८), आणि सासू (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता घरात व्यवस्थित काम करत नाही, तसेच सोफासेट, टीव्ही माहेरहून आणण्यासाठी, घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी व इतर कारणांसाठी विवाहितेकडे पैशांची वेळोवेळी मागणी केली. किरकोळ कारणावरून त्यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असे, फिर्यादीत नमूद केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.