शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 2:19 PM

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. वाहनचालकांना थांबवुन त्यांनी यापुर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरलेला आहे का? याची तपासणी इलेक्ट्रॉनिक बील मशिनव्दारे केली जात होती. त्यावेळी ‘‘तुम्ही कोणाच्या परवानगीने रस्त्यावर वाहनांची तपासणी करत आहात’’?, ‘‘तुम्हाला कोणी अधिकार दिले ’’ अशी विचारणा करून शसकीय कामात अडथळा आणणाºया एकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.  

                   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन कांचनसिंग जुन्नी (वय ३२,राजनगर, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार कौशल नवाब सिंग यांनी या प्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याबरोबर मनिष कुमार, एस.एस. मोरे हे स्पाईन रस्ता, त्रिवेणीनगर चौक निगडी येथे वाहनचालकांना थांबवुन ‘इ वे बील’ तपासणी करीत होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आला. कोणाच्या परवानगीने वाहन तपासणी करीत आहात, तुम्हाला कोणी अधिकार दिले? अशी विचारणा करू लागला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                      पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या आदेशानुसार शहरात ठिकठिकाणी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहिम सुरू आहे. गेल्या २० दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. साडेसहाशे वाहनचालकांवर उलट दिशेने वाहन चालवुन रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामध्ये सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपलसिट अशा प्रकारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांचा समावेश आहे. हिंजवडी, वाकड येथील वाहतुक कोंडी समस्येवर विविध उपाययोजनांव्दारे तोडगा काढला जात असताना,शहराच्या विविध भागात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसArrestअटक