नराधम बापानेच केले चिमुकलीवर अत्याचार; सांगवी पोलिसांनी नारधमास केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:19 IST2017-12-07T15:16:11+5:302017-12-07T15:19:41+5:30
वडिलांनीच पोटच्या अडिच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. नारधमास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

नराधम बापानेच केले चिमुकलीवर अत्याचार; सांगवी पोलिसांनी नारधमास केली अटक
पिंपरी : वडिलांनीच पोटच्या अडिच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या घटनेचा मुलीच्या आईला धक्का बसल्याने बुधवारी तिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नारधमास पोलिसांनी अटक केली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.आरोपी हा वाहनचालक म्हणून काम करतो. त्याने दारूच्या नशेत ८ दिवसांपूर्वी पत्नी कामात व्यस्त असताना, आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. आईने स्वत: डोळ्याने हा प्रकार पाहिला. आरोपीला कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ही मारहाण केली. महिला मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर आठ दिवसांनी तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बाल बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.