राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पिंपरीत मोठी कारवाई; २९ किलो गांजा जप्त

By रोशन मोरे | Updated: September 12, 2023 22:28 IST2023-09-12T22:27:51+5:302023-09-12T22:28:27+5:30

सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली...

Major action in Pimpri by State Excise Department 29 kg of ganja seized | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पिंपरीत मोठी कारवाई; २९ किलो गांजा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पिंपरीत मोठी कारवाई; २९ किलो गांजा जप्त

पिंपरी :  राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत काळेवाडी भागामध्ये 29 किलो वजनाचा दोन लाख अठरा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमाराची कारवाई करण्यात आली.

 मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना काळेवाडी ते केफएसी चौक, डी. पी रोड सेन्ट अॅल्फॉन्सो स्कूल शेजारील किशोर रामचंद्र पंजाबी यांचे मालकीच्या रुममध्ये तपासणी केली असता एनडीपीएस कायदा अंतर्गत हिरव्या रंगाची अर्धवट वाळलेले गांजाची पान व फुले व बाँडे असलेला एकुण २९.८२१ किलो वजनाची दोम लाख १८, हजार २१० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त मुद्देमालाजवळ कोणीही संशयित व्यक्ती  मिळून आला नाही म्हणुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Major action in Pimpri by State Excise Department 29 kg of ganja seized