Main Market closed in Pimpri to protest the killing of Hitesh Mulachandani | हितेश मूलचंदानीच्या हत्ये निषेधार्थ पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद
हितेश मूलचंदानीच्या हत्ये निषेधार्थ पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद

ठळक मुद्देहितेश मुलचंदानीला न्याय देण्याच्या मागणीसाठी सिंधी समाजबांधवांकडून निदर्शने बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन

पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादातून हितेश मूलचंदानी या तरुणाचा सोमवारी पिंपरीत खून झाला. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मारेकऱ्यांना फाशी द्या, हितेश मुलचंदानीला न्याय द्या, अशा मागणीचे फलक घेऊन सिंधी समाजबांधवांकडून निदर्शने करण्यात आली.
पिंपरी कॅम्पातील दुकाने व्यावसायिकांनी बुधवारी बंद ठेवली. बुधवारी सकाळी बाजारपेठेत निदर्शने करण्यात आली. व्यापारी व व्यावसायिकांनी यात सहभाग घेतला. वुई वॉन्ट जस्टीस फाईट फॉर राईट,मारेकऱ्यांना फाशी द्या,अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बंद पाळण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्राचा एका हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाला. किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत त्याला मित्राचा फोन आला. हितेश त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला. तिथे सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. 
चौघांनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.


Web Title: Main Market closed in Pimpri to protest the killing of Hitesh Mulachandani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.