Mahashivratri 2025 : शिवभक्तांना ‘घाटेश्वर मंदिर’ पाडतंय भुरळ; पर्यटक व शिवभक्तांची दर्शनासाठी होते गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:18 IST2025-02-26T15:17:54+5:302025-02-26T15:18:41+5:30
शिंदेवाडी हे मंदिर प्राचीन असून मंदिराचा पूर्ण गाभारा चौकोनाकृती दगडांनी आकर्षित पद्धतीने रचण्यात आला

Mahashivratri 2025 : शिवभक्तांना ‘घाटेश्वर मंदिर’ पाडतंय भुरळ; पर्यटक व शिवभक्तांची दर्शनासाठी होते गर्दी
टाकवे बुद्रुक : निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आंदर मावळातील शिंदेवाडी येथील प्राचीन महादेवाचे घाटेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या पर्यटकांना तसेच शिवभक्तांना भुरळ पाडत आहे. श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी तसेच महाशिवरात्रीला मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे मंदिर परिसरात येताच येथील घनदाट झाडी, सतत वाहणारा वारा येथील भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. अल्प कालावधीतच प्रसिद्धी झोतात आलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी मावळ तालुक्यासह इतर भागातील पर्यटक भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
यामुळे भाविक व पर्यटक होत आहेत आकर्षित....
शिंदेवाडी हे मंदिर प्राचीन असून मंदिराचा पूर्ण गाभारा चौकोनाकृती दगडांनी आकर्षित पद्धतीने रचण्यात आला असून मंदिराच्या अवतीभवती असलेल्या घनदाट झाडी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
महाशिवरात्रीला मोठे कार्यक्रम...
दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात येते. यामध्ये प्रवचन, भजन महाप्रसादाचा कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थ दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात पार पडतो.