महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, धमकावून केला वारंवार अत्याचार; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:20 IST2023-03-10T14:19:47+5:302023-03-10T14:20:17+5:30
या प्रकरणी महिलेची चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद...

महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, धमकावून केला वारंवार अत्याचार; चिंचवडमधील घटना
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केला. तसेच तिच्या अकाउंटमधून एका ॲपद्वारे पैसे काढून फसवणूक केली. ही घटना २९ ऑगस्ट २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रणजित संजय सपकाळ (वय २८, रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्याशी मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण केले. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच धमकावून वेळोवेळी अत्याचार केला. तसेच फिर्यादी यांच्या अकाउंटमधून फोन पेद्वारे पैसे काढून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.