प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून तरूणीवर वार, आरोपीला पिंपरीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:27 IST2017-10-23T13:24:17+5:302017-10-23T13:27:28+5:30

प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय ३०) याला अटक केली आहे.

love affair, the accused arrested by pimpri police | प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून तरूणीवर वार, आरोपीला पिंपरीत अटक

प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून तरूणीवर वार, आरोपीला पिंपरीत अटक

ठळक मुद्देप्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वारतरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु

पिंपरी : प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (२२ आॅक्टोबर) रात्री ११च्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय ३०, रा. पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी जखमी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार या तरुणीचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तर बबलूचे तरुणीसह तिच्या मैत्रीणीशीही प्रेमसंबंध होते. या दोघीही बबलूला भेटायला पिंपरी येथे आल्या. त्यावेळी तिघांमध्ये वाद झाले. या वेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून रागाच्या भरात बबलूने तरुणीवर चाकूने गळ्यावर वार केले. या मध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
 

Web Title: love affair, the accused arrested by pimpri police