शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

धुक्यात हारवला राष्ट्रीय महामार्ग; कामशेत, लोणावळा परिसरात सकाळच्या वेळी वाहतूक संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:37 AM

धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.

ठळक मुद्देजुना मुंबई पुणे महामार्गासह द्रुतगती मार्गावर या धुक्याचा जाणवला चांगलाच प्रभाव नाणे, अंदर, पवन मावळासह कामशेत शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धुक्याचा प्रभाव

लोणावळा/कामशेत : लोणावळा परिसरात आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. वाहनांच्या लाईट लावत संथ गतीने वाहने मार्गक्रमण करत होती. धुक्यांमुळे गावे दिसेनाशी झाली होती. धुक्यासोबत थंडी देखिल वाढल्याने नागरिकांनी सूर्यनारायणाचे दर्शन होईपर्यत घरातच बसणे पसंत केले.तर मागील काही दिवसा पासून मावळ तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात थंडी पेक्षा धुक्याची तीव्रता वाढत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडी पूर्ण गायब झाली असताना व उन्हाचा तडाखा वाढला असताना अचानक दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. त्यात मंगळवारी तर कामशेत व परिसरावर धुक्याने हल्लाबोल केला होता. या धुक्याची तीव्रता मोठी असल्याने समोरील पन्नास फुटावरील ही काही दिसत नव्हते. यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

जुना मुंबई पुणे महामार्गासह द्रुतगती मार्गावर या धुक्याचा चांगलाच प्रभाव जाणवला. दोन्ही मार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. महामार्गाच्या समोरील काही दिसत नसल्याने वाहन चालकांची मोठी दैना उडाली. 

याशिवाय नाणे, अंदर, पवन मावळासह कामशेत शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धुक्याचा मोठा प्रभाव होता. या ठिकाणाहून सकाळी सकाळी नोकरदार वर्ग, विद्यार्थी, दुग्धव्यवसायिक व अन्य जणांना धुक्या मुळे कामशेत पर्यंत पोहचण्यास मोठा त्रास झाला. दुचाकीस्वारांचे धुक्याच्या काहूरामुळे कपडे ओले झाले. अचानक झालेल्या या धुक्याच्या हल्ल्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. धुक्याचा प्रभाव सकाळी दहा वाजे पर्यंत कायम राहीला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkamshetकामशेतlonavalaलोणावळा