जीवे मारण्याची आणि अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 19:27 IST2019-04-22T19:25:25+5:302019-04-22T19:27:27+5:30
घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

जीवे मारण्याची आणि अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लुटला
पिंपरी : घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.
गुडीया शफीक शेख (वय ३५, रा. समता कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेख या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास नळावर पाणी भरत असताना अनोळखी चार जण त्यांच्या घरात शिरले. ‘तुमच्याकडे जेवढे सोने, पैसे असतील ते आम्हाला काढून द्या, नाहीतर तुला मारुन टाकीन व मुलीवर अतिप्रसंग करीन’ अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपींपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे व सोने नाही दिले तर मुलाला मारुन टाकीन अशी फिर्यादीला धमकी दिली. दरम्यान, दुसरया आरोपीने फिर्यादी महिलेच्या तोंडावर हात धरुन ‘तु जर ओरडली तर तुला देखील मारुन टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीने कपाटातील ८ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १ लाख २५ हजार रुपयांची रोकड काढून दिल्यानंतर आरोपी दहा लाखांचा ऐवज घेवून तेथून पसार झाले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.