भोसरी एमआयडीसीत पादचाऱ्याला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:25 IST2019-07-14T20:23:59+5:302019-07-14T20:25:42+5:30
रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तिघांजणांनी जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील २ हजार रुपये असा १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला.

भोसरी एमआयडीसीत पादचाऱ्याला लुटले
पिंपरी : रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तिघांजणांनी जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील २ हजार रुपये असा १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावर घडली.
या प्रकरणी भुषण सुनिल महाजन (वय २०, रा. बालाजी इंडस्ट्रीज, भोसरी एमआयडीसी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुषण हे भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावरुन शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास चालले होते. यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांचा रस्ता आडवला व जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २ हजारांची रोख असा एकूण १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पोलिस उपनिरीक्षक जे.एस.गिरनार पुढील तपास करत आहेत.