भरदिवसा घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:20 IST2019-07-26T19:19:41+5:302019-07-26T19:20:18+5:30

बंद घराचे कुलूप तोडून घरातील ३ लाख २१ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. थेरगाव येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loot jewelry worth Rs three lakh at PCMC | भरदिवसा घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास

भरदिवसा घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास

पिंपरी : बंद घराचे कुलूप तोडून घरातील ३ लाख २१ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. थेरगाव येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मनीषा गणेश बन्ने (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मनीषा गुरुवारी सकाळी ११ वाजता कामनिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ३ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुपारी एक वाजता घरी परतल्यानंतर मनीषा यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Loot jewelry worth Rs three lakh at PCMC