लोकमत 'लोक'जीबी विशेष: PCMC चे आयुक्त सहलीसाठी शहरात येतात! माजी नगरसेवकांचा रोष
By प्रमोद सरवळे | Updated: March 7, 2024 14:19 IST2024-03-07T14:18:51+5:302024-03-07T14:19:03+5:30
शहरात अनेक गंभीर प्रश्न असताना काही मोजके अधिकारी चार भिंतींच्या आत पालिकेचा कारभार करतायेत, नगरसेवकांचा आरोप

लोकमत 'लोक'जीबी विशेष: PCMC चे आयुक्त सहलीसाठी शहरात येतात! माजी नगरसेवकांचा रोष
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह सहलीसाठी शहरात येतात. शहरातील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर आहे पण प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. काही मोजके अधिकारी चार भिंतींच्या आत पालिकेचा कारभार करत आहे असा आरोप काही नगरसेवकांनी केला.
प्रशासक काळात शहरातील विकासकामांच्या नुसत्या निविदा काढल्या. प्रत्यक्ष त्या ठिकाणे कामे खूप कमी झाले. प्रत्येक विभागाचा अधिकारी त्या त्या भागाचा बॉस झाल्यासारखे वागत आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केला.
शहरातील शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न मांडण्यात आला. चिंचवडमधील लिंक रोडची अवस्था, पालिकेच्या शाळांची वाईट अवस्था, शहरातील नाल्यांची अवस्थेमुळे, पाण्याची गैरसोय, रस्त्यांवरील खड्डे असे प्रश्न असताना या शहराला खरंच स्मार्ट शहर म्हणायचं का? असा सवालही माजी नगरसेवकांनी केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत आल्यानंतर दापोडी भागातील प्रश्न सुटत नाहीत. त्या भागातील पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्नाकडे स्थानिक माजी नगरसेवकांनी लक्ष वेधले. तसेच शहरातील नदी क्षेत्रात असणारा जलपर्णीचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. स्मशानभूमीत हात पाय धुण्यासाठी पाणी मिळत नाही. शहरातील स्मशानभूमीत निदान पाण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकांनी केली.