चक्कर अाल्याने इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:04 IST2018-05-20T17:04:38+5:302018-05-20T17:04:38+5:30

25 फुटांवरुन पडल्याने डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मारुंजीत घडली.

laborer's death by falling down from the building | चक्कर अाल्याने इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू 

चक्कर अाल्याने इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू 

पिंपरी : बांधकाम साईटवरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मारुंजी येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. दत्ता अशोक कांबळे (वय ३२, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राधा कांबळे (वय ५२, रा. चिखली) यांनी या प्रकरणी शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मल्लू शिंगे (वय ४०, रा. पिंपळे गुरव), रशीद उर्फ दिलदार अहमद बदबूय्या (रा. चिखली) आणि मित्तल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. कंपनीचे मालक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मित्तल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे एक बांधकाम मारुंजी येथे सुरु आहे. संजय आणि रशीद हे कामगारांकडून बांधकाम साईटवर काम करून घेतात.  २५ फूट उंचीवर लोखंडी अँगलचे काम करीत असताना अचानक चक्कर येऊन कामगार खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावरून काम करून घेणाऱ्या कंत्राटदारांसह कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय आणि रशीद यांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. कामगारांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सुरक्षा पट्टा अशी कोणतीच सुरक्षा साधने पुरविली नव्हती. 

 

 

 

Web Title: laborer's death by falling down from the building