पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

By नारायण बडगुजर | Updated: December 28, 2023 17:25 IST2023-12-28T17:21:02+5:302023-12-28T17:25:02+5:30

पिंपरी येथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली...

koyta stabbing on suspicion of having relationship with wife, incident in Pimpri | पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

पिंपरी : पत्नी सोबत संबंध असल्याचे संशयातून पतीने एका तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. पिंपरी येथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सुखदेव रंगनाथ केदारी (३४, रा. रासे, ता. खेड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जीवन रामचंद्र केदारी (३३, रा. खेड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २७) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एका ३० वर्षीय संशयित तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुणाच्या पत्नीशी सुखदेव याचे संबंध असल्याचा संशय संशयित तरुणाला होता. त्यामुळे त्याने सुखदेव व फिर्यादी जीवन यांना घरी बोलावून घेतले. घरी बोलावून त्याने सुखदेव यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पाेलिस उपनिरीक्षक वर्षा कादबाने तपास करीत आहेत.

Web Title: koyta stabbing on suspicion of having relationship with wife, incident in Pimpri