Pune | उसने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून व्यावसायिकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 20:55 IST2023-01-11T20:51:49+5:302023-01-11T20:55:02+5:30
लवकर पैसे दे नाहीतर तुला आणि तुझ्या मुलाला पोलिसामध्ये अडकवतो, अशी धमकी...

Pune | उसने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून व्यावसायिकाचे अपहरण
पिंपरी : व्यावसायिकाने उसने घेतलेले पैसे परत केले नाही, म्हणून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ९) रात्री साडेअकराच्या सुमारास भोसरी येथे घडली. या प्रकरणी विष्माचार्य पांडुरंग मोरे (वय ४४, रा. चिखली) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सागर बबन चव्हाण (वय ३५), अनिकेत उत्तम सरवडे (वय २१), संकेत मंजाभाऊ औटी (वय २६), राजू शिवाजी राठोड (वय २६), श्रमिक सिद्धार्थ तांबे (वय २२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादींचे नातेवाईक आहेत. त्यांनी एकत्र येत फिर्यादीला उसने दिलेल्या पैशाविषयी विचारणा करत शिवीगाळ केली. सागर चव्हाण आणि त्याच्या सोबत असलेल्या बाऊन्सरने फिर्यादीला जबरदस्ती गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर इतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. तसेच आरोपी सागर याने तुला आता गोडाऊनमध्ये नेऊन टाकतो. तू लवकर पैसे दे नाहीतर तुला आणि तुला मुलाला पोलिसामध्ये अडकवतो, अशी धमकी दिली.