शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’त खरमाटेंचे ‘वसुली रॅकेट’? विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर चर्चेस ऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:01 IST

- सध्या ते काही सहकाऱ्यांच्या मदतीने राज्यभर वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

पिंपरी : आरटीओ विभागात बदली आणि वसुलीचे संगनमताने चालणारे रॅकेट राज्यभर कार्यरत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. या रॅकेटचे सूत्रधार म्हणून सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांचे नाव पुढे आले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयांमध्येही त्यांची यंत्रणा सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पूर्वीच्या परिवहनमंत्र्यांच्या कार्यकाळात खरमाटे यांनी बदलीप्रक्रियेत हस्तक्षेप करत स्वतंत्र जाळे उभे केले होते. सध्या ते काही सहकाऱ्यांच्या मदतीने राज्यभर वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मनासारख्या बदल्या आणि आर्थिक व्यवहार घडवून आणले जात असल्याचे वडेट्टीवार त्यांनी नमूद केले.

चंद्रपूर येथे काही अधिकाऱ्यांनी या दबावाला विरोध केल्यावर त्यांच्यावर कारवाई घडवून आणण्यासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत बनावट सापळे रचून कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खरमाटे हे पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणेवर दबाव निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये काही मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक निरीक्षक या कथित यंत्रणेच्या दबावाखाली काम करत असल्याचे पुढे आले आहे. खरमाटे यांच्या सांगण्यावरून नियमांना बगल देत कामे करण्यास भाग पाडले जात असून, त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही अधिकारी स्वेच्छेने या वसुलीच्या साखळीत सहभागी असल्याचेही सूचित करण्यात आले.

पीसीएमसी आरटीओ ताब्यात घेण्यासाठी हालचाली

राज्यभर वसुली रॅकेटच्या आरोपांदरम्यान आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘खरमाटे यंत्रणे’च्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव वाढवण्यासाठी आणि यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांमार्फत सक्रिय प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad RTO: Kharamate's 'Recovery Racket'? Allegations Spark Debate

Web Summary : Vijay Wadettiwar alleges a state-wide RTO transfer and recovery racket led by Bajrang Kharamate. Pune and Pimpri-Chinchwad RTOs are allegedly involved, pressuring officials for transfers and financial gains. Some officials allegedly face police action for resistance, impacting citizens.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड