शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

टँकर, विहिरी, बोअरमधील पाण्याच्या तपासणीचा नुसताच आदेश!

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 29, 2025 10:00 IST

गुणवत्ता न तपासताच पाणीपुरवठा : खासगी पुरवठ्यावर अंकुश कोणाचा?

ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी : दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील खासगी विहिरी, बोअरवेल, टँकरमार्फत पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच जारद्वारे वितरित करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. मात्र, तरीही शहरात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गुणवत्ता न तपासताच सोसायट्यांमध्ये पाणी वितरित केले जात असल्याचे मंगळवारी (दि. २८) ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.महापालिकेने जीबीएस रुग्ण आढळलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या चिखली, भोसरी, वाकड, पिंपळे गुरव भागात जास्त आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे प्रक्रिया केलेले पाणी येत नाही, अशा भागातील ही संख्या आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात थेट विहिरीतून प्रक्रिया न करता थेट सोसायट्यांना पाणी पुरविले जात आहे. महापालिकेचे पाणी अपुरे पडत असल्याने किंवा महापालिका पाणीच देऊ शकत नसल्याने सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मोठ्या सोसायट्यांना रोज २० पेक्षा जास्त टँकर लागत असल्याची व्यथा सोसायटीधारकांनी ‘लोकमत’कडे मांडली. टँकर कुठून येतात, याची माहितीच नाही!शहरात रोज हजारो टँकर पाणीपुरवठा करत असले तरी ते पाणी कोठे भरतात, टँकर भरणा केंद्राला येणारे पाणी कसे उपलब्ध होत आहे, ते कॅनॉल किंवा बोअर किंवा विहिरीचे आहे का याची कोणतीही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे ‘जीबीएस’वर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी टँकर भरणा केंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी टँकर पाणी कोठून आणतात याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पण ‘जीबीएस’चा धोका वाढत असल्याने ही माहिती संकलित केली जाईल. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे तपासण्यात येतील, असे सांगत महापालिका अधिकारी बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.राजकीय वरदहस्तामुळे मुजोरीटँकरचालकांना राजकीय वरदहस्त असून प्रचंड मुजोरीला सामोरे जावे लागते. पाणी कुठून आणले, कसे आणले याची कोणतीही माहिती व्यवस्थित दिली जात नाही. पवना व इंद्रायणी नदीच्या बाजूने काही विहिरी आहेत, तर काहींनी थेट नदीतूनच पाणी उचलण्याची व्यवस्था केली आहे. तेथून हे पाणी थेट टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरविले जाते.गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण सर्व वयोगटांतील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. दूषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही परिस्थितीत दूषित पाण्याचा शिरकाव होणार नाही. आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी मोहीम तीव्र करण्याच्या सूचना केल्या आहेत. विहिरींची माहिती संकलित करण्याचेही आदेश दिले आहेत. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य