शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिसेरा’ अहवालाने रखडला गुन्ह्यांचा तपास

By admin | Updated: August 30, 2015 03:01 IST

मृतदेहाचे विच्छेदन करताना संशयास्पद स्थिती आढळल्यास डॉक्टर व्हिसेरा राखून ठेवून न्यायवैद्यक प्रयोगशाळा अथवा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवितात.

- मंगेश पांडे,  पिंपरी मृतदेहाचे विच्छेदन करताना संशयास्पद स्थिती आढळल्यास डॉक्टर व्हिसेरा राखून ठेवून न्यायवैद्यक प्रयोगशाळा अथवा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवितात. येथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांकडून मृत्यूच्या कारणाचा अंतिम अहवाल पोलिसांना दिला जातो. मात्र, प्रयोगशाळेकडून मुदतीत अहवाल प्राप्त होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या वर्षीच्या आठ महिन्यांत अवघे ५६ अहवाल प्राप्त झाले आहेत. अपघाती मृत्यू, एखाद्या गुन्ह्यात झालेला मृत्यू अथवा संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन केले जाते. या दरम्यान डॉक्टरांना काही संशयास्पद आढळ्यास ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातो. हा ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जातो. येथील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित डॉक्टरांकडून अंतिम अहवाल तयार करून तपास अधिकाऱ्याकडे पाठविला जातो. त्यानंतर तपासाला गती येते. अनेक प्रकरणांत न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे प्रकारही घडले आहेत. डॉक्टरांच्या अहवालावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे या अहवालालादेखील अत्यंत महत्त्व असते. ‘व्हिसेरा’ म्हणजे शवविच्छेदनादरम्यान शरीरातील काही अवयव तपासणीसाठी काढून घेतले जातात. मृत्यू ज्या अवयवाशी संबंधित आहे. तो अवयव प्रामुख्याने घेतला जातो. एका बाटलीत विशिष्ट प्रकारचे केमिकल टाकून त्यामध्ये हे अवयव ठेवले जातात. ही बाटली सीलबंद करून तपास अधिकाऱ्याकडे दिली जाते. त्यांच्यामार्फतच ‘व्हिसेरा’ न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जमा केला जातो. यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हृदय या अवयवांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पोस्टमार्टेम सेंटरमध्ये शहरासह जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांतूनही मृतदेह विच्छेदनासाठी येत असतात. त्यामुळे दर दिवशी विच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या किमान दोन ते तीन इतकी असते. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान वायसीएममधील पोस्ट मार्टेम सेंटरमध्ये १ हजार ७४ शवविच्छेदन झाले. यापैकी २७२ मृतदेहांचे ‘व्हिसेरा’ राखून ठेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. याच आठ महिन्यांत केवळ ५६ तपासणी अहवाल ‘पोस्टमार्टेम सेंटर’ला प्राप्त झाले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिलेले अहवाल महिनाभरात प्राप्त होणे अपेक्षित असते. मात्र, सहा-सहा महिने उलटूनही अहवाल प्राप्त होत नसल्याने तपास यंत्रणेत अडथळे येत आहेत. मृताचा नातेवाईक जोरदार पाठपुरावा करीत असेल, तर तपास अधिकारीही तितक्याच तत्परतेने हालचाली करतात. पोलीस प्रयोगशाळेकडेही याबाबत पाठपुरावा करतात. संशयास्पद मृत्यूनंतर त्याबाबत नातेवाईक डॉक्टरांकडे विचारपूस करण्यास गेले असता ‘व्हिसेरा’ राखून ठेवला असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. मात्र, याबाबतची नातेवाइकांना फारशी माहिती नसते. त्यानंतर नातेवाईक पोलिसांकडेही पाठपुरावा करतात. शवविच्छेदन विभागातून पोलीस तपास अधिकारी ‘व्हिसेरा’ घेऊन जातात. मात्र, अनेकदा तो प्रयोगशाळेपर्यंत पोहोचतच नाही. इतर कामकाजात व्यस्त असलेले पोलीस कर्मचारी यासाठी वेळ काढतील, तेव्हा तो प्रयोगशाळेत जमा होतो. या दरम्यान ‘व्हिसेरा’ खराब होण्याचीही भीती असते.मृतदेह विच्छेदनासाठी आल्यानंतर त्यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातो. त्यानंतर तो तपासणीसाठी पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविला जातो. तेथून त्यांचा अहवाल आल्यानंतरच अंतिम अहवाल तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे दिला जातो. - डॉ. आर. वाय. साळुंखे,वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदन विभाग