शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या संस्थाचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:46 IST2019-09-17T14:45:01+5:302019-09-17T14:46:13+5:30
'बाहेर ये, तुला गोळ्याच घालतो', अशी धमकी दिली.

शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या संस्थाचालकाला अटक
पिंपरी : शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी देणा-या संस्थाचालकाला अटक करण्यात आली. शाळेत जाऊन शिक्षकाला शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी शुक्रवारी (दि. 13) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत बाबासाहेब बाबर (वय 64) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजीव रामचंद्र बाबर (वय 40, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव बाबर हे इंद्रायणीनगर येथील स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आरोपी संस्थेचा संस्थाचालक आहे. शुक्रवारी शाळेत आल्यानंतर आरोपी यशवंत बाबर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच 'बाहेर ये, तुला गोळ्याच घालतो', अशी धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.