Pune Crime| इंदोरी येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:48 IST2022-02-14T18:45:20+5:302022-02-14T18:48:03+5:30
रात्री पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली...

Pune Crime| इंदोरी येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले
पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले. मावळ तालुक्यातील इंदोरी येथे रविवारी (दि. १३) रात्री पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रभान नामदेव बिराजदार (वय २७, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, मूळ रा. हुमनाबाद, जि. बिदर) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. त्यांच्या ट्रकचा रविवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास इंदोरी येथे किरकोळ अपघात झाला. त्यामुळे ते ट्रकमधून खाली उतरून टॉर्चने ट्रकची पाहणी करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून अनोळखी तीन जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीचा पाच हजारांचा मोबाईल फोन आणि आठ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण तपास करीत आहेत.