शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 2:59 AM

इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृष्टीने रिफ्युजी क्षेत्र सोडणे बांधकाम नियमावलीने बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी - इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृष्टीने रिफ्युजी क्षेत्र सोडणे बांधकाम नियमावलीने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता उंच इमारतींमध्ये रिफ्युजी क्षेत्र असल्याचे फलक संबंधित ठिकाणी दर्शनी भागावर लावल्याचे दिसून येत आहे.शहरात गेल्या काही वर्षांत अधिक उंचीच्या इमारती दिसून येऊ लागल्या आहेत. मुंबईसारखे इमारतीचे इमले इथे दिसून येत नव्हते. मात्र गेल्या दहा वर्षांत बांधकाम व्यवसायाला या भागात चालना मिळाली. दहा वर्षांपूर्वी शहरात बहुतांश चार मजली इमारती होत्या. या इमारतींना लिफ्ट सुविधा नव्हती. सात मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा बंधनकारक असल्याने बहुतांश बांधकाम व्यावसायिक चार मजली इमारतीस प्राधान्य देत होते. अलीकडच्या काळात ७० मीटरपर्यंत उंच इमारतींना परवानगी मिळू लागली. वाढीव एफएसआय, टीडीआर मंजूर होऊ लागला. त्यामुळे कमीत कमी जागेत उंच इमारती बांधणे बांधकाम व्यावसायिकांना सोईस्कर ठरू लागले आहे. पिंपरी, चिंचवड, वाकड, भोसरी, सांगवी, हिंजवडी परिसरात टॉवर उभारल्याचे दृष्टिपथास येऊ लागले आहे. जसे सात मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा बंधनकारक, तसेच २४ मजल्यांपासून ते ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना ‘रिफ्युजी क्षेत्र’ स्वतंत्र जागा सोडणे बंधनकारक केले आहे. सुविधा नसेल, तर पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. पूर्णत्वाचा दाखला मिळण्यास अडचणी येऊ नयेत, यासाठी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.उंच इमारतीत २४ मीटरनंतरच्या उंचीवर प्रत्येक सातव्या मजल्यावर ‘रिफ्युजी क्षेत्र’ याकरिता विशिष्ट आकाराची स्वतंत्र जागा सोडणे आवश्यक आहे. ३० मीटरपेक्षा अधिक उंच इमारतीत पहिले ‘रिफ्युजी क्षेत्र’ २४ मीटरवर असावे, असे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नव्याने होणाºया गृहप्रकल्पांमध्ये ‘रिफ्युजी क्षेत्र ’ असे फलक झळकताना दिसून येत आहेत.नेमके काय आहे रिफ्युजी क्षेत्र?इमारतीची रचना केली जात असताना, आपत्कालीन परिस्थितीत उंच इमारतीतील नागरिकांना मदत कशी देता येईल. आग अथवा अन्य प्रकारची आपत्कालीन स्थिती ओढवल्यास इमारतीतील रहिवाशांना एका ठिकाणी जमा होता येईल. त्या ठिकाणी बाहेरून मदतीसाठी पाचारण केलेली यंत्रणा त्यांना मदत मिळवून देऊ शकेल. इमारतीच्या खालून वरपर्यंत रिफ्युजी क्षेत्रापर्यंत मोठी शिडी अथवा दोरखंड बांधून इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न करता येतील. संकटसमयी इमारतीतील रहिवाशांनी इतरत्र सैरभैर धावाधाव करण्यापेक्षा विशिष्ट अशा एका ठिकाणी एकत्र यावे, याकरिता उपलब्ध करून दिलेली जागा यालाच रिफ्युजी क्षेत्र म्हटले जाते.सात मजल्यांच्या लिफ्ट कुचकामीसात अथवा त्याहून अधिक मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सात मजल्यांच्या प्रत्येक इमारतीला लिफ्ट सुविधा आहे. परंतु अनेक इमारतींच्या लिफ्ट नादुरुस्त आहेत. महापालिकेने झोपडीवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधलेल्या इमारतींना लिफ्ट सुविधा आहे. या इमारतींमधील देखभाल-दुरुस्ती खर्च झोपडीतून इमारतीत आलेल्या झोपडीवासीयांना परवडत नाही. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींना असलेली लिफ्ट सुविधा कुचकामी ठरू लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या