शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:49 IST

पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी मागणी

देहूगाव: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम देहूगावातील इनामदार वाडा येथे असतो. या ठिकाणी श्री तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव व पालखी सोहळ्याचे संस्थापक तपोनिधी नारायण महाराज यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा वाडा वारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मुख्य मंदिराच्या शेजारी असलेला हा ऐतिहासिक वाडा पूर्वी तीन मजली होता आणि इंद्रायणी नदीपर्यंत पसरलेला होता. सध्या अस्तित्वात असलेला वाडा १५० वर्षांपूर्वी विष्णू महाराज गोसावी यांनी बांधला असल्याची माहिती दिलीप गोसावी यांनी दिली. पालखीच्या ऐतिहासिक सुरुवातीपासूनच या वाड्याला एक विशेष आध्यात्मिक स्थान प्राप्त झाले आहे.

पालखी मुक्कामाची तयारी पूर्ण

पालखी प्रस्थानानंतर इनामदार वाड्याच्या मध्यभागी पालखीचा मुक्काम होतो. याआधी पादुकांची शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा होते. या दिवशी वाड्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. वाड्यातील मुक्कामासाठी तात्पुरते पत्राशेड उभारले गेले असून, पावसाच्या स्थितीत साधारणतः २०–२५ वारकऱ्यांनाच मुक्काम करता येतो. जास्त भाविकांना मुक्काम देणे शक्य नाही. वाड्याच्या मध्यभागी पत्राशेडसह कापडी मंडप घालण्यात आले असून, सजावटीसाठी रंगीत झुंबर आणि कमान उभारण्यात आली आहे.

गर्दी नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त

वाड्याला केवळ एकच अरुंद दरवाजा असल्याने भाविकांच्या प्रवेश व निर्गमासाठी विशेष व्यवस्था केली आहे. नायलॉन दोरांच्या साहाय्याने रांगेचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून भाविक एका बाजूने आत येऊन दुसऱ्या बाजूने सहज बाहेर पडू शकतील. पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण आणि समर्पित सुरक्षाव्यवस्था मंगळवारपासूनच तैनात करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी वाड्याच्या आत न जमता मोकळ्या जागेत राहावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी आमची मागणी आहे. -दिलीप महाराज गोसावी

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpurपंढरपूरdehuदेहू