शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Pimpri Chinchwad: पत्नीला जीवे मारल्याच्या प्रकरणात पतीसह दोघांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 11:06 AM

पत्नीला पाचव्या मजल्यावरून ढकलून जीवे मारल्याप्रकरणी दाखल खटल्यात पतीसह दोघांची निर्दोष मुक्तता...

पिंपरी : नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीत घर पाहण्यासाठी आलेल्या पत्नीला पाचव्या मजल्यावरून ढकलून जीवे मारल्याप्रकरणी दाखल खटल्यात पतीसह दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आळंदी येथे २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती.

देवीदास तुकाराम पालवे (वय ३७, रा. तीनखडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) तसेच त्याचा वाहनचालक निवृत्ती उर्फ गोट्या शेषराव घुले (वय २८, रा. शेकटे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अशी निर्दोष मुक्तता केलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय राजगुरूनगर खेड येथील न्यायाधीश ए. म. अंबळकर यांच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

मंदा देवीदास पालवे (रा. तीनखडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपण आळंदी येथे नवीन घर घेऊ आणि मुलांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी पुण्यातच राहूया, असे सांगून देवीदास पालवे हे पत्नी मंदा पालवे यांना घेऊन आळंदी येथे आले. नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीमधील नवीन सदनिका पाहण्यासाठी ते पाचव्या मजल्यावर गेले. त्यावेळी त्यांची मुले व भाऊ इमारतीच्या खाली गेल्यानंतर मंदा पालवे यांचा पडून मृत्यू झाला. पती देवीदास पालवे यांनी पत्नी मंदा यांना ढकलून जीवे मारले, अशी तक्रार करण्यात आली. त्यावरून देवीदास पालवे आणि त्याचा वाहनचालक निवृत्ती उर्फ गोट्या घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदा पालवे यांना आपण ढकलले नसून इमारतीवरून मोकळ्या जागेतून ती चुकून घसरून पडली, असे सांगत देवीदास पालवे यांच्याकडून बचाव करण्यात आला.

परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेल्या या केसमध्ये सरकारी पक्षाद्वारे ११ साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली. परंतु, तपासामधील त्रुटी व साक्षीदारांची उलटतपासणी यामध्ये मंदा पालवे यांचा मृत्यू ही हत्या असल्याचे सिद्ध झाले नाही. फिर्यादी व साक्षीदारांच्या उलटतपासणीमध्ये केवळ वैयक्तिक आकसापोटी आरोपींच्या विरोधात त्यांनी जबाब देण्याचे काम केल्याचे उघड झाल्याने, देवीदास पालवे आणि निवृत्ती घुले या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. मंगेश धुमाळ यांनी काम पाहिले. तर सरकारी पक्षातर्फे ॲड. विकास देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी