पिंपरी-चिंचवडमध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:35 IST2022-11-19T18:31:02+5:302022-11-19T18:35:02+5:30

आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली...

In Pimpri-Chinchwad, a woman living next door was molested by sending an obscene video | पिंपरी-चिंचवडमध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग

पिंपरी-चिंचवडमध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग

पिंपरी : शेजारी राहणाऱ्या महिलेचा नंबर मिळवून तिच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर वारंवार मेसेज तसेच अश्लील व्हिडीओ पाठवून त्रास देण्यात आला. तसेच महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत निगडी प्राधिकरणात घडला. या प्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१८) फिर्याद दिली. त्यानुसार ३९ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने दुसऱ्या शेजाऱ्याकडून फिर्यादीचा नंबर मिळवला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला ईमेल व व्हॉटसअपवर अश्लिल मेसेज, व्हिडीओ पाठवून अश्लिल भाषेत बोलला. फिर्यादी यांचा हात आरोपीने पकडून त्यांच्यात मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती करत फिर्यादीच्या पतीला तसेच मुलांना शिवीगाळ करून धमकी देत मारहाण केली.

Web Title: In Pimpri-Chinchwad, a woman living next door was molested by sending an obscene video