धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:45 IST2023-12-30T12:41:44+5:302023-12-30T12:45:02+5:30

रुग्णवाहिका चालवत असतानाच, या दोन्ही चालकांनी पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला...

In a running ambulance, driver molested woman helper, crime against two drivers | धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा

धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा

पिंपरी : रुग्णवाहिकेवरील दोन चालकांनी वेगवेगळ्या वेळी रुग्णवाहिकेवरील मदतनीस महिलेचा विनयभंग केल्याची घटना ३० नोव्हेंबर आणि १० डिसेंबर रोजी आळंदी येथे घडली. रुग्णवाहिका चालवत असतानाच, या दोन्ही चालकांनी पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोरखनाथ दराडे (वय ४०) आणि शिवप्रसाद ससाणे (४१) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही संशयित रुग्णवाहिकेवर चालक आहेत. फिर्यादी महिला मदतनीस म्हणून काम करते. ३० नोव्हेंबर रोजी दराडे रुग्णवाहिका चालवत असताना, महिला त्यांच्याशेजारी बसली होती. त्यावेळी दराडेने विनयभंग केला. दरम्यान, १० डिसेंबर रोजी ससाणे रुग्णवाहिका चालवत असताना, त्याने महिलेसमोरच एका व्यक्तीस अश्लील शब्दात शिवीगाळ केली. ‘मी सर्पमित्र असून, माझी तक्रार केली, तर खेळ खल्लास करेन,’ अशी धमकी दिली.

Web Title: In a running ambulance, driver molested woman helper, crime against two drivers