शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

मावळ तालुक्यातील अवैध धंद्यांना पूर्णविराम देणार - नवनीत काँवत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:21 PM

काही ठिकाणी मटके, जुगारचे क्लब, पर्यटनस्थळांवर अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे.

लोणावळा : मावळ तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना पुर्णविराम देण्याचा मनोदया लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नवनीत काँवत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांनी नव्यानेच लोणावळा उपविभागाचा कार्यभार स्विकारला आहे.    काँवत म्हणाले, माझ्या कार्यकक्षेत वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर ही चार पोलीस ठाणी येतात. पूर्वी याठिकाणी काय चालायचं मला माहिती नाही मात्र आता या भागात कोठेही अवैध धंद्यांना स्थान दिले जाणार नाही. मावळ उपविभागाची माहिती घेताना कामशेत व वडगाव पोलीस ठाणे हद्दीत तसेच हायवे लगतचे अनेक हॉटेल व धाबे येथे बनावट तसेच विना परवाना दारु विक्री केली जाते, काही ठिकाणी मटके, जुगारचे क्लब, पर्यटनस्थळांवर अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना तातडीने हे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखिल आपल्या आजुबाजुला कोठेही अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ लोणावळा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणाचीही गय केली जाणार नाही. माझ्या कार्यकाळात व माझ्या कार्यकक्षेत कोठेही अवैध व्यावसाय चालणार नाहीत याचा नागरिकांनी विश्वास बाळगावा. पोली कर्मचार्‍यांकडून देखिल गैरवर्तन होत असल्यास खबर करावी, प्रत्येक तक्रारीची शहनिशा करुन दखल घेतली जाईल असे काँवत यांनी सांगितले. काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी असून लोणावळ्यात त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसmavalमावळ