शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: 'तू फॉर्म भरलास तर तुला पाहून घेईन’, 'मविआ' च्या राहुल कलाटेंची वंचितच्या उमेदवाराला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:31 IST

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे - राहुल कलाटे

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी झाली होती. वेगवेगळ्या पक्षांतील उमेदवारांनी अर्ज भरला. याचदरम्यान चिंचवडमधील वंचित बहुजन आघाडीच्या जावेद रशीद शेख यांना महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेरगाव येथील निवडणूक निर्णय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरावा लागतो. मंगळवारी दुपारी जावेद शेख वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. तेव्हा, राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना ‘तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर तुला पाहून घेईन’, अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमधून फेकून दिल्याची तक्रार काळेवाडी पोलिस ठाण्यात शेख यांनी दिली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाटे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला, याच दिवशीच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद शेख महिलांच्या बाजूला थांबला म्हणून त्याला दुसरीकडे जाऊन थांबण्यास सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. - राहुल कलाटे, महाविकास आघाडी उमेदवार

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliceपोलिसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण