Pimpri Chinchwad | "खंडणी दे नाही तर मुलाचा मर्डर करेल..."; खंडणी मागणाऱ्याला अटक
By रोशन मोरे | Updated: March 18, 2023 18:46 IST2023-03-18T18:44:26+5:302023-03-18T18:46:19+5:30
जबरदस्तीने ४० हजार रुपये काढून घेतले...

Pimpri Chinchwad | "खंडणी दे नाही तर मुलाचा मर्डर करेल..."; खंडणी मागणाऱ्याला अटक
पिंपरी : खंडणी नाही दिली तर मुलाचा मर्डर करेन, अशी धमकी दिली. तसेच जबरदस्तीने ४० हजार रुपये काढून घेतले. ही घटना जानेवारी २०२२ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत देहुरोड पोलीस ठाण्याच्य हद्दीत घडली. या प्रकरणी संदीप उर्फ संजय आनंदा काळोखे (वय ४०, रा. तळवडे) यांनी शुक्रवारी (दि.१७) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुधीर सोपान जाधव याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीस ‘तु प्लॉटींग व्यवसायामध्ये भरपूर पैसा कमवला आहे. माझ्यावर मर्डर आणि रेपची केस असून मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे. तुला जर प्लॉटींगचा धंदा करायचा असल्यास मला दर महिना १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे न दिल्यास तुला त्रास होईल, अशी धमकी देवून आरोपीने गूगल पे नंबरवर फिर्यादीकडून ३८ हजार रुपये घेतले. परत आरोपी फिर्यादीच्या ऑफिस मध्ये आला त्याने टेबलच्या ड्रायवरमध्ये हात घालून ४० हजार रुपये काढून घेततले. तसेच आणखी दोन लाख रुपयांच खंडणी मागून पैसे न दिल्यास फिर्यादीस आणि फिर्यादीच्या मुलाची मर्डर करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.