शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा

By नारायण बडगुजर | Updated: December 8, 2023 23:58 IST

तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते.

पिंपरी : ‘‘मी नको म्हणून सांगत होतो. मात्र, तिनं ऐकलं नाही, ती कामाला गेली. मी तिला सकाळी कामावर सोडलं आणि होत्याचं नव्हतं झालं’’, असे सांगताना अभयकुमार मिश्रा यांना दाटून आले होते.

तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. अभयकुमार मिश्रा यांच्या पत्नी पूनम (वय ३७) यादेखील येथे कामाला होत्या. उत्तर प्रदेश येथील देवरिया या गावाचे असलेले मिश्रा दाम्पत्य काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आले. तळवडे येथील गणेशनगर भागात भाडेतत्त्वावर मिश्रा दाम्पत्य राहत आहे. १४ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षीय मुलगा अशी अपत्ये असलेल्या मिश्रा यांचा संसार सुखात सुरू होता. अभयकुमार हे आंबेठाण येथे फॅब्रिकेशन शाॅपमध्ये कामाला आहेत.

घरखर्चाला मदत व्हावी म्हणून गेल्या चार महिन्यांपासून पूनम मिश्रा फटाक्याच्या कारखान्यात कामाला जात होत्या. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत त्या कामावर असायच्या. त्यासाठी त्यांना दरदिवसाला २८० रुपये मजुरी मिळायची. ती कमी असल्याने पती अभयकुमार त्यांना कामावर पाठवण्यास तयार नव्हते. मात्र, इतर महिला जातात. मीही जाते, असा आग्रह करून पूनम यांनी कारखान्यात काम सुरू केले होते. अभयकुमार दररोज त्यांना कामावर सोडून जात होते.

मिश्रा दाम्पत्याची शुक्रवारची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू झाली. पूनम यांनी त्यांच्यासाठी तसेच पती अभय यांच्यासाठी जेवणाचे डबे भरले. मुलगी आणि मुलगा शाळेत गेले. त्यानंतर अभय हे पूनम यांना फटाक्याच्या कारखान्यात सोडून आंबेठाण येथे त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले. त्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या घराशेजारच्या व्यक्तीचा फोन आला. पूनम कुठे कामाला आहे, असे त्यांनी विचारले. फटाका कारखान्यात कामाला असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यात आग लागल्याचे शेजारच्या व्यक्तीने फोनवरून संगितले. त्यानंतर अभयकुमार अस्वस्थ झाले. नेमके काय झाले असेल, असा विचार करत ते आंबेठाण येथून तळवडे येथे पोहचले. तेथून वायसीएम रुग्णालयात गेले.कोळसा पाहून काळजाचा थरकाप उडाला... -अभय कुमार वायसीएम रुग्णालयात पोहोचले. तेथे मृतांमध्ये त्यांच्या पत्नीची ओळख करून देण्यासाठी नेण्यात आले. मात्र, सर्वच मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या काळजात चर्र झाले. त्यांचा थरकाप उडाला. या मृतांमध्ये पत्नीचा मृतदेह कोणता, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या दोन भावांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.आपल्याला पैशांची आवश्यकता नाही. कामाला जाऊ नकोस, असे मी पूनमला सांगत होतो. मात्र, तिचा आग्रह कायम होता. या दुर्घटनेने होत्याचे नव्हते झाले.- अभय कुमार मिश्रा, गणेशनगर, तळवडे

टॅग्स :fire crackerफटाकेfireआगFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक