माझ्या नादी लागायचे नाही, नाहीतर संपवून टाकीन! हॉर्न वाजवणाऱ्यास धमकी, चिखलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:09 IST2023-09-05T12:09:35+5:302023-09-05T12:09:53+5:30

पिंपरी : रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कारला बाजूला करण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजवला. त्याचा राग आल्याने तरुणाला तसेच त्याच्या आई-वडिलांना ...

I don't want to get nadi, otherwise I will end it! A threat to the horn player, the kind in the mud | माझ्या नादी लागायचे नाही, नाहीतर संपवून टाकीन! हॉर्न वाजवणाऱ्यास धमकी, चिखलीतील प्रकार

माझ्या नादी लागायचे नाही, नाहीतर संपवून टाकीन! हॉर्न वाजवणाऱ्यास धमकी, चिखलीतील प्रकार

पिंपरी : रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कारला बाजूला करण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजवला. त्याचा राग आल्याने तरुणाला तसेच त्याच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. ‘माझ्या नादी लागायचे नाही. नाहीतर सर्वांना मारून टाकीन’, अशी धमकीही दिली गेली.

ही घटना ३१ ऑगस्टला धर्मराजनगर (चिखली) येथील रस्त्यावर घडली. याप्रकरणी केतन कृष्णा वाघमोडे (वय २२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अविनाश गायकवाड (२४, रा. पाटीलनगर, चिखली) याच्यासह दोन महिलांवर तसेच अविनाशसोबत असलेल्या त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन त्यांच्या घरी चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या कारला बाजूला करण्यासाठी केतन यांनी गाडीचा हाॅर्न वाजवला. त्यावेळी संशयित अविनाश आणि त्याच्या मित्राने शिवीगाळ करत केतन यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान केले. तेथे दोन अनोळखी महिला आल्या. त्यांनीही शिवीगाळ करत केतन यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. अविनाशने केतनच्या आईला दगड मारून जखमी केले. ‘माझ्या नादी लागायचे नाही नाहीतर सर्वांना मारून टाकीन’, अशी धमकी दिली.

Web Title: I don't want to get nadi, otherwise I will end it! A threat to the horn player, the kind in the mud