फोनवरून पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या पतीला गैरसमजातून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 21:05 IST2019-07-04T21:02:06+5:302019-07-04T21:05:20+5:30
पत्नीला मोबाईल फोनवरून पतीने शिवीगाळ केली. शिवीगाळ आपल्यालाच केल्याचा तेथील काही जणांचा गैरसमज झाला. त्यावरून संबंधित पतीस बांबूने जबर मारहाण केली.

फोनवरून पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या पतीला गैरसमजातून मारहाण
हिंजवडी : पत्नीला मोबाईल फोनवरून पतीने शिवीगाळ केली. शिवीगाळ आपल्यालाच केल्याचा तेथील काही जणांचा गैरसमज झाला. त्यावरून संबंधित पतीस बांबूने जबर मारहाण केली. सुस येथे दि. ३० जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जामवंत चांदेरे (वय ३०, रा. सुस) यांनी फिर्याद दिली आहे. नेताजी गाडेकर, अंकुश गाडेकर, शहाजी गाडेकर, लहू गाडेकर, नीलेश गाडेकर (सर्व रा. सुसगाव) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी प्रशांत चांदेरे पत्नीबरोबर मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावळेस काही कौटुंबिक कारणास्तव पत्नीला शिवीगाळ करत असताना सदर आरोपींना आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा समज झाला. फियार्दी चांदेरे आपली गाडी बाहेर काढत असताना आरोपींनी गाडी आडवी लावली त्याबद्दल जाब विचारला असता आरोपींनी लाकडी बांबूने फिर्यादी चांदेरे यांना डोक्यावर, पायावर, हातावर मारहाण करत जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.